‘मॉम-टू-बी’ दृष्टी धामीचे बेबी शॉवर; सेलिब्रिटींनीही लावली हजेरी

Drashti Dhami Baby Shower| ‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे. नुकतेच तिचे तिच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
दृष्टीने बेबी शॉवरसाठी निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यामध्ये तिने बेबी बंपही फ्लॉन्ट केल्याचं दिसत आहे. दृष्टीच्या बेबी शॉवरला सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. यावेळी नकुल मेहता, सनाया इराणी, जानकी मेहता हे कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री सनाया इराणीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
सोबतच फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दृष्टी धामी आणि नीरज खेमका तुमच्या दोघांसाठी प्रेम आणि फक्त प्रेम. अभिनंदन, तुम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना मी तुमच्या दोघांसाठी खूप उत्साहित आहे. तुमचे दिवस आनंदाने, हास्याने आणि गोड क्षणांनी भरले जावो.”
View this post on Instagram
“तुम्ही तुमच्या सुंदर बाळाचे जगात स्वागत करण्याची तयारी करत असताना तुम्हाला खूप प्रेम आणि शुभेच्छा देते. तुम्ही पालक होणार आहात आणि तुमचे बाळ सर्वात भाग्यवान होणार आहे. मीही एक आवडती मावशी होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही,” यावेळी सनाया खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, दृष्टी धामीने ‘मधुबाला’सह ,’दिल मिल गए’,’परदेस मे है मेरा दिल’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘दुरंगा’ आणि ‘द एम्पायर’ या वेबसिरीजमध्ये देखील झळकली होती. ज्यातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.
हेही वाचा:
बदलीच्या रिंगणात बजरंग पुनियाला ताकद दाखवणारे काँग्रेसचे आमदार कुलदीप वत्स कोण ?





