पुणे जिल्हा | मोईत महिला सक्षमीकरण, सबलीकरण

चिंबळी, (वार्ताहर) – हॅन्ड इन हॅन्ड इंडिया, तळेगाव दाभाडे आणि शॉक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत यांच्या मार्फत चाकण विभागातील मोई, चिंबळी, कुरुळी, माजगाव या गावांमध्ये महिला सक्षमीकरण यावर काम करण्यात येत आहे, त्यातील मोई या गावात 10 दिवसीय केक बनविणे प्रशिक्षण घेण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण व सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे, बसण्यासाठी जागा ही ग्रामपंचायतीने महिलांना मोफत देण्यात आली.
त्याअंतर्गत मोई येथील प्रशिक्षणामध्ये एकूण 30 महिलांनी सहभाग घेतला. त्यांना विविध नवीन प्रकारचे केक बनविणे शिकवण्यात आले यातून त्यांना व्यवसाय सुरुवात करण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून रुचिका ठाकूर यांनी मार्गदर्शन केले तसेच हॅन्ड इन हॅन्डकडून ओंकार कुलकर्णी, सुवर्णा करपे आणि मोई ग्रामपंचायतमधील सरपंच शीलाताई रोकडे, उपसरपंच संतोष येळवंडे, सदस्य सारिका करपे, आरती फलके, सोमनाथ गवारी आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश गवारी या सर्वांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.





