मोई: सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

चिंबळी –मोई (ता. खेड) येथील विविध ठिकाणी अंतर्गत असलेल्या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीट कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व कुरुळी मरकळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे यांच्या जिल्हा परिषद व स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत 27 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
पाटील वस्ती, फलके वस्ती, शेरी नगर, भैरवनाथ नगर येथील अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन सरपंच शिलाताई रोकडे, उपसरपंच शितल गवारे आणि सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती ग्रामसेवक भास्कर वीर यांनी दिली.
यावेळी अर्चना फलके, ज्योती करपे, मंगल गवारी, विश्वनाथ गवारी, सचिन येळवंडे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आदर्श सरपंच पाटील गवारे, राहुल गवारे, माजी उपसरपंच देवीदास मेदनकर, किरण गवारे, माजी सरपंच पुष्पांजली करपे, पोलीस पाटील नारायण बिडकर, गोरख गवारे, जालिंदर गवारे, आनंद गवारे, निलेश की गवारे, रोहीदास गवारे, विश्वास फलके, नामदेव गवारे, चंद्रकांत गवारे, दत्तात्रय हजारे, युवराज फलके आदी मान्यवर यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.





