छत्रपती संभाजी राजे यांच्याहस्ते चौथऱ्याचे भूमिपूजन

नगर – महापालिकेच्या आवारात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 फुटी चौताऱ्यावर साकारणार 12 फुटीची भव्य दिव्यमूर्ती याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते झाले.
यावेळी खा. डॉ.सुजय विखे, आ. संग्राम जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ.पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, मा.स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना चोपडा, मा.विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, सभागृह नेते अशोक बडे, नगरसेवक मनोज कोतकर, गणेश कवडे, अनिल बोरुडे, संभाजी कदम, सचिन शिंदे, प्रकाश भागानगरे, श्याम नळकांडे, संजय चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, उपायुक्त यशवंत डांगे, उपयुक्त श्रीनिवास कुऱ्हे आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची व्याप्ती आणि त्यांनी स्वराज्य का निर्माण केले हे सर्वांना माहीत आहे. महापालिका महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारत आहे. त्यासाठी महापालिकेचे कौतुक आहे. परंतु उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याचा योग्य सांभाळ करून महाराजांचे विचार नव्या पिढीसमोर घेऊन जाण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. खा. विखे म्हणाले, या कामासाठी आ. जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. मी ही कामासाठी निधी दिला आहे. परंतु हा निधी अद्याप पर्यंत रिलीज झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी महापौर शेंडगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.





