बारामतीच्या मोहन कांबळेंच्या गाडीने वेधलं लक्ष; डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गाडीला आकर्षक स्वरूप, पहा फोटो

बारामती : बारामती येथील मोहन कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या गाडीला भव्य आणि आकर्षक स्वरूप दिले आहे. ते पाहून नागरिकांचे डोळे थक्क होत आहेत. गाडीच्या माध्यमातून मोहन कांबळे यांनी सामाजिक जागृतीचा एक संदेश दिला आहे.
या खास सजावटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच इतर थोर महापुरुषांची चित्रे लावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गौतम बुद्ध, अण्णाभाऊ साठे यांचे देखील चित्ररूप दर्शन यात घडते. ही सजलेली गाडी केवळ एक शोभेची वस्तू नसून, ती एक सामाजिक आणि ऐतिहासिक संदेश वाहून नेणारी चळवळ आहे.
या देखाव्यासह मोहन कांबळे बारामतीहून पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी निघाले आहेत. पुण्यात पोहोचल्यावर ही गाडी अनेक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि लोक याचे कौतुक देखील करत आहेत. सामाजिक ऐक्य, समतेचा संदेश आणि थोर नेत्यांच्या विचारांची उजळणी करणारा हा देखावा खरोखरच प्रेरणादायी ठरत आहे.





