Karnataka Assembly Election 2023: चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षकपदी मोहन जोशी यांची नियुक्ती
Updated On:

पुणे – अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून प्रत्येक जिल्ह्यात लोकसभा मतदार संघनिहाय ज्येष्ठ नेत्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रदेश काॅंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांची चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्र कॉँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संघटन) खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून देण्यात आले आहे.
मोहन जोशी यांनी कॉँग्रेस पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले असून आतापर्यंत 12 राज्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कामांसाठी प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. जोशी यांच्या नियुक्तीनंतर पुणे शहर काॅंग्रेस कमिटी सरचिटणीस व प्रवक्ता रमेश अय्यर यांसह पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.





