Mohan Bhagwat : विविधतेमध्ये एकता भारताच्या डीएनएमध्येच आहे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं मत
विविधतेमध्ये एकता हे भारताच्या डीएनएमध्येच आहे. ही विविधतेतील एकता जपली गेली पाहिजे. साजरी केली गेली पाहिजे, या एकतेचा आदर केला गेला पाहिजे आणि हे ऐक्य जपले गेले पाहिजे, असे राष्ट्रीय. स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले आहे.

Mohan Bhagwat : विविधतेमध्ये एकता हे भारताच्या डीएनएमध्येच आहे. ही विविधतेतील एकता जपली गेली पाहिजे. साजरी केली गेली पाहिजे, या एकतेचा आदर केला गेला पाहिजे आणि हे ऐक्य जपले गेले पाहिजे, असे राष्ट्रीय. स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटले आहे.
न्यूयॉर्क शहरातील मेडिसन स्क्वेअर गार्डनमधील इन्फोसिस थिएटर येथे शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाला अमेरिकेतील भारतीय वंशाचे तब्बल ६ हजार सदस्य उपस्थित होते. वैविध्यतेचा स्वीकार करून आपल्या समुदायालापाठिंबा देण्याचे आवाहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी यावेळी केले.
अमेरिकन हिंदूज फॉर एन्गेजमेंट ऍन्ड डायलॉग या मंचाने आयोजितच केलेल्या युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन नावाच्या कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी भारतातील विविधतेतील एकतेचे महत्व विषद केले. अमेरिकेबाबत बोलत असताना वैविध्य या शब्दाचा स्वाभाविकपणे उल्लेख केला जातो. भारताबद्दल बोलत असताना विविधतेमध्ये एकता असे नेहमी म्हटले जाते.
भारतासाठी एकता आणि विविधता दोन्ही डीएनएमध्येच आहेत. या विविधतेतील एकतेतूनच भारताची ओळख होते. भारताने जगाला याच विविधतेतील एकतेतून भारताची वेळोवेळी ओळख करून दिली आहे, असे भागवत म्हणाले. युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन कार्यक्रमाला अमेरिकेतील ३९ राज्यांमधील ८५३ शहरे, विविध विद्यापीठांमधील २५० विद्यार्थी आणि अमेरिकेतील २५० संघटनांमधील लोक एकत्र आले होते.
आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत. हे ऐक्य समाजाला आणि जगाला परत देण्याची वेळ आली आहे. आपण काय कमावले, यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो, हे आता महत्वाचे आहे, असे सांगताना भागवत यांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाला आपल्या कर्मभूमीशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन देखील केले.
या कार्यक्रमात विविध धर्माच्या नेत्यांनी ऐक्य, दया, करुणा आणि दुसऱ्याला मदत करण्यावर भर दिला. यावेळी भारतीय आणि जगभरातील सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवणारे अमेरिकेतील कलाकारांचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
पंचसूत्री कृतीचे आवाहन
याप्रसंगी ३० देशांमधील १८० धार्मिक नेत्यांनी पंचसूत्री कृतीचे आवाहन केले. स्वतःपासून सुरुवात, एकदुसऱ्यासाठी उभे रहाणे, गरज भासण्यापुर्वी नाते वृद्धिंगत करणे, एकत्र सेवा आणि भविष्यासाठीची जबाबदारी स्वीकारणे, या पंचकृ कार्यक्रमांचे आवाहन यावेळी केले गेले. भारतात मुस्लिमांनी राहता कामा नये, असे कोणी हिंदू म्हणत असेल, तर ती व्यक्ती हिंदू असूच शकत नाही, असे भागवत (Mohan Bhagwat) यांनी यावेळी स्पष्ट केले.






