“हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना सांप्रदायिक नसून” ; बांग्लादेश सरकारचे आणखी एक धक्कादायक विधान

Mohammed Yunus । बांग्लादेशात सुरु असणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र आता याच घटनांवर बांगलादेश सरकारने एक धक्कादायन विधान केले आहे. एका पोलिस अहवालाचा हवाला सरकारकडून देशात ४ ऑगस्ट २०२४ नंतर झालेल्या अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि तोडफोडीच्या बहुतेक घटना “सांप्रदायिक नसून राजकीय स्वरूपाच्या होत्या.”असे धक्कादायक विधान करण्यात आले आहे.
आतापर्यंत जातीय हिंसाचाराच्या २०१० घटनांची नोंद Mohammed Yunus ।
बांगलादेश पोलिसांनी अल्पसंख्याक समुदायाच्या संपर्कात राहण्यासाठी आणि सांप्रदायिक हिंसाचाराचे थेट अहवाल प्राप्त करण्यासाठी एक व्हॉट्सअॅप नंबर प्रसिद्ध केला आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात याविषयी माहिती देण्यात आली आहे, बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या आरक्षणविरोधी आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी देश सोडून जाण्याच्या एक दिवस अगोदरपासून ते या वर्षी ८ जानेवारीपर्यंत, जातीय हिंसाचाराच्या २,०१० घटनांची नोंद झाली आहे.अशी माहिती देण्यात आहे.
किमान १६१ दावे खोटे किंवा बनावट होते Mohammed Yunus ।
निवेदनानुसार, या घटनांपैकी १,७६९ घटना हल्ले आणि तोडफोडीशी संबंधित होत्या. दाव्यांच्या आधारे, पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६२ गुन्हे दाखल केले आहेत आणि तपासाच्या आधारे किमान ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, “तपासात असे आढळून आले की बहुतेक प्रकरणांमध्ये हल्ले जातीय स्वरूपाचे नव्हते तर ते राजकीयदृष्ट्या प्रेरित होते.” तसेच, “पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की १,२३४ घटना “राजकीय स्वरूपाच्या” होत्या, २० घटना सांप्रदायिक होत्या आणि किमान १६१ दावे खोटे किंवा बनावट होते.” अशी धक्कादायक माहिती सादर करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “परिषदेच्या दाव्यांनुसार, ५ ऑगस्ट २०२४ रोजी जेव्हा हसिना सरकार सत्तेवरून उलथून टाकण्यात आले तेव्हा १,४५२ घटना (एकूण घटनांपैकी ८२.८ टक्के) घडल्या. ४ ऑगस्ट रोजी किमान ६५ आणि ६ ऑगस्ट रोजी ७० घटना घडल्या. निवेदनानुसार, ५ ऑगस्ट २०२४ ते ८ जानेवारी २०२५ पर्यंत, पोलिसांना परिषदेच्या दाव्याव्यतिरिक्त जातीय हिंसाचाराच्या १३४ तक्रारी प्राप्त झाल्या. पोलिसांनी सर्व तक्रारींवर प्राधान्याने कारवाई केली आणि किमान ५३ गुन्हे दाखल केले आणि ६५ आरोपींना अटक केली, असे त्यात म्हटले आहे.
निवेदनानुसार, “गेल्या वर्षी ४ ऑगस्टपासून आतापर्यंत सांप्रदायिक हिंसाचाराच्या तक्रारींच्या आधारे एकूण ११५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि या प्रकरणांमध्ये किमान १०० लोकांना अटक करण्यात आली आहे.” अहवाल तयार करण्यापूर्वी, बांगलादेश पोलिसांनी परिषदेने दावा केलेल्या कथित सांप्रदायिक घटनांची यादी गोळा केली आणि हिंसाचाराचा सामना करणाऱ्या प्रत्येकाशी बोलले. या घटना घडलेल्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक आस्थापनेला पोलिसांनी भेट दिली.
निवेदनानुसार, बांगलादेश पोलिसांनी आता जातीय हिंसाचाराच्या तक्रारी प्राप्त करण्यासाठी आणि अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, अंतरिम सरकार देशातील जातीय हल्ल्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण ठेवते आणि पोलिसांना आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे की अंतरिम सरकारने पीडितांना भरपाईची घोषणा देखील केली आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांत हिंदूंसह इतर अल्पसंख्याक समुदायांवर अनेक हल्ले झाले आहेत आणि त्यांच्या घरांची आणि धार्मिक स्थळांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. भारताने या घटनांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.





