Mohammed Shami : ‘देश सर्वात आधी येतो नंतर उपवास…’, टीका करणाऱ्या मौलानाला शमीच्या माजी कोचने दिले चोख प्रत्युत्तर

Mohammed Shami Ramzan Fast : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रमजान महिन्यातील उपवास न केल्याने बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी टीका केली आहे. मौलाना म्हणाले, की जर एखादी व्यक्ती जाणूनबुजून उपवास करत, नसेल तर तो पापी आहे. त्यांच्या मते भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसला होता. त्यामुळे त्याने इस्लामिक शरियाचे नियम पाळले नाहीत आणि उपवास केला नाही. म्हणून त्याने अल्लाहकडे माफी मागावी. यावर शमीचे माजी प्रशिक्षक बद्रुद्दीन सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यादरम्यान, मोहम्मद शमीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो उन्हात एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. त्यानंतर मौलानांनी ते चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यांच्या मते, रमजानमध्ये उपवास न करणे हे पाप आहे. यावर बद्रुद्दीन म्हणाले, या प्रकरणात मोहम्मद शमीची चूक नाही, संपूर्ण देश त्याच्यासोबत आहे. देशापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.
देशापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही – बद्रुद्दीन सिद्दीकी
बद्रुद्दीन सिद्दीकी म्हणाले, ‘देश सर्वात आधी येतो. देशापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. तो नंतरही उपवास करु शकतो. आपला इस्लाम इतका लहान नाही की तो एका ठिकाणी आकुंचन पावेल. इस्लाममध्ये असेही आहे की जर तुम्ही आजारी असाल, तर तुम्ही नंतरही उपवास करु शकता. जे लोक हे प्रश्न उपस्थित करत आहेत ते देशाचे समर्थन करत नाहीत. तो (शमी) देशासाठी काहीही करायला तयार आहे. तो उपवासही सोडतो… तो देशासाठी सर्वकाही करत आहे. संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळायचा आहे आणि अशा विधानांमुळे खेळाडूंचे मनोबल खचते. त्यामुळे तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार कोणी दिला?’
मौलाना शहाबुद्दीन रझवी काय म्हणाले होते?
ऐसे दो कौड़ी के कठमुल्ले जिनकी खुद की तो 5 कदम चलने की औकात नही है वो.. दुबई की इस भीषड़ गर्मी मे देश की सेवा करने वाले महान खिलाड़ी के एनर्जी ड्रिंक पीने पर चवन्नी वाला ज्ञान दे रहे .
थूकता हूं ऐसे देश विरोधी गद्दार मौलाओं पर@MdShami11 #MohammedShami #Ramadan #Shami #Roza pic.twitter.com/DDYb77aOxE
— Ravi Pandey🇮🇳 (@ravipandey2643) March 6, 2025
अखिल भारतीय मुस्लिम जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘इस्लामने उपवास अनिवार्य घोषित केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून उपवास केला नाही, तर तो अत्यंत दोषी आहे. मोहम्मद शमीने उपवास केला नाही. उपवास करणे हे त्याचे कर्तव्य आहे. उपवास न करून शमीने मोठे पाप केले आहे. तो शरियाच्या दृष्टीने मोठा गुन्हेगार आहे. त्याने इस्लामिक शरियाचे नियम पाळले नाहीत आणि उपवास केला नाही. म्हणून त्याने अल्लाहकडे माफी मागावी.’





