Mohammed Shami : रोजा न ठेवल्याने मोहम्मद शमीवर टीकेचा भडिमार; जावेद अख्तर काय म्हणतात, पाहा….

Javed Akhtar | Mohammed Shami : उत्तर प्रदेशातील बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मोहम्मद शमीने रमजानमध्ये उपवास केला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान तो मैदानावर एनर्जी ड्रिंक पिताना दिसला. त्याने जाणूनबुजून उपवास केला नाही, जे पाप आहे. तो शरियाच्या दृष्टीने गुन्हेगार आहे.
खरंतर, दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान मोहम्मद शमीचा एनर्जी ड्रिंक पितानाचा व्हिडीओ समोर आला होता. ज्यावर बरेलीच्या मौलानांनी नाराजी व्यक्त केली. त्याने इस्लामिक शरियाचे नियम पाळले नाहीत आणि उपवास केला नाही. म्हणून त्याने अल्लाहकडे माफी मागावी. असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.
ऐसे दो कौड़ी के कठमुल्ले जिनकी खुद की तो 5 कदम चलने की औकात नही है वो.. दुबई की इस भीषड़ गर्मी मे देश की सेवा करने वाले महान खिलाड़ी के एनर्जी ड्रिंक पीने पर चवन्नी वाला ज्ञान दे रहे .
थूकता हूं ऐसे देश विरोधी गद्दार मौलाओं पर@MdShami11 #MohammedShami #Ramadan #Shami #Roza pic.twitter.com/DDYb77aOxE
— Ravi Pandey🇮🇳 (@ravipandey2643) March 6, 2025
दरम्यान, अश्यातच भारताच्या ढाण्या वाघाची पाठराखण करण्यासाठी ज्येष्ट गीतकार जावेद अख्तर पुढे आले आहेत. जावेद अख्तर यांनी याआधीही देशातील वेगेवगळ्या घटनांवर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. शमीवर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटरवर शमीची पाठराखण केली आहे. “शमी साहेब, तुम्ही मूर्ख कट्टरपंथी लोकांकडे लक्ष देऊ नका.
Shami saheb , don’t give a damn to those reactionary bigoted idiots who have any problem with your drinking water in a burning afternoon at a cricket field in Dubai . It is none of their business. You are one of the great Indian team that is making us all proud My best wishes…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 7, 2025
दुबईत दुपारी कडक ऊन असते. अशा स्थितीत तिथे क्रिकेटच्या मैदानावर पाणी पिल्यामुळे या लोकांना त्रास होत आहे. जो भारतीय संघ संपूर्ण देशाची मान उंच करतो, त्याच टीमचा तुम्ही एक भाग आहात. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत तसेच भारतीय टीमसोबत आहेत,” असे जावेद अख्तर यांनी म्हटलंय.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यादरम्यान, मोहम्मद शमीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो उन्हात एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. त्यानंतर मौलानांनी ते चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यांच्या मते, रमजानमध्ये उपवास न करणे हे पाप आहे. यावर बद्रुद्दीन म्हणाले, या प्रकरणात मोहम्मद शमीची चूक नाही, संपूर्ण देश त्याच्यासोबत आहे. देशापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही.





