ED action : बसपाच्या माजी आमदाराची 4,440 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीने दिला दणका…

Mohammed Iqbal ED action (लखनौ) :- बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार महंमद इक्बाल यांना ईडीने मोठाच दणका दिला आहे. त्यांची एकूण ४४४० कोटींचीअवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अवैध खाणकाम प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ज्यांच्या मालकीच्या १२१ एकर जागेवर ग्लोकल विद्यापीठ आहे. ती इमारत आणि जमिन ईडीने जप्त केली आहे. ही जागा अब्दुल वहिद एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर आहे. अ्राणि या ट्रस्टवर महंमद इक्बाल आणि त्यांच्या कुटुंबियांचे नियंत्रण आहे.
T20 World Cup 2024 (IND vs CAN) : भारत-कॅनडा लढतीत पावसानं मारली बाजी, नाणेफेक ‘न’ होता सामना रद्द…
इक्बाल सध्या दुबईत आहे. त्याला चार मुले आहेत, यापैकी एक जण सध्या तुरूंगात असून इक्बालचा भाऊही विविध गुन्ह्यांखाली तुरूंगात आहे. या कुटुंबाचे अनेक अवैध व्यवहार व धंदे सुरू आहेत. त्यावरून त्याच्या कुटुंबातील अनेकांवर वेगवेळे गुन्हेही दाखल आहेत.





