पुणे – आशिया कप फायनल जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर थ्री-झिरो असे ट्विट केले. क्रिकेट विजयाची तुलना ऑपरेशन सिंदूरशी करणे हा सैन्याचा अपमान असल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीदीन ओवेसी यांनी मंगळवारी पुण्यात केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापामध्ये ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, माजी खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. ही क्रिकेट मॅच खेळली नसती तर पाकिस्तानला पैसे मिळाले नसते. सिंधू करार रद्द करून ८०% पाणी रोखले, व्यापार, वाघा बॉर्डरही बंद केली. यामुळे क्रिकेट मॅच खेळण्याची काय गरज होती असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला.संघाने जेवढे पैसे दिले त्याच्या दुप्पट पैसे लष्करासाठी एकट्या पुण्यात जमा झाले असते. हा पैशाचा विषय नसून देशवासियांच्या अभिमानाचा विषय असल्याचेही ते म्हणाले.