“मोदींनी कन्याकुमारी येथे केलेले ध्यान म्हणजे केवळ फोटोशुट ईव्हेंट”; तेजस्वी यादव यांची टीका

Tejashwi Yadav On PM Modi| लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यानंतर 4 जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. याकडे सर्व देशाचे लागले आहे. दुसरीकडे, भाजपने 400 पारचा नारा देत तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे.
दरम्यान, सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथे दोन दिवसांच्या ध्यानधारणेसाठी गेले आहेत. येथील त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका देखील केली जात आहे.
‘पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारी येथे सुरू केलेले ध्यान म्हणजे केवळ फोटोशुट ईव्हेंट आहे. फोटो शूट संपले की ते तेथून परत जातील’, अशी टीका बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. Tejashwi Yadav On PM Modi|
मतदानाचा एक टप्पा बाकी असताना मोदींनी असले पब्लिसीटी स्टंट करण्यास विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी हा ध्यान कार्यक्रम करायला हवा होता, त्याच्या आधीच मोदींनी ध्यान धारणा सुरू करून त्याला टीव्हीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन त्यांनी एकप्रकारे प्रचारच चालवला असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने तेजस्वी यादव यांनी ही टीका केली आहे. Tejashwi Yadav On PM Modi|
निवडणुकीच्या संबंधात बोलताना तेजस्वी म्हणाले की, “बिहारमध्ये आश्चर्यकारक निकाल लागेल आणि इंडिया आघाडी देशपातळीवर ३०० जागांच्या पुढे जाईल. केंद्रात भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही.” दरम्यान , आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार असून त्या बैठकीसाठी आपण दिल्लीत जात असल्याची माहितीही तेजस्वी यांनी दिली.
हेही वाचा:
‘सर्वसामान्य जनता आपल्या सोबत, त्यामुळे मीच जिंकणार..’; एक्झिट पोलआधी निलेश लंकेंचा मोठा दावा





