CJI Bhushan Gawai : सुप्रीम कोर्टातील हल्ल्यानंतर मोदींचा सरन्यायाधीशांना फोन, काय झाला संवाद?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध नोंदवण्यासाठी मोदींनी ती कृती केली. गवई यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती स्वत: मोदींनीच नंतर सोशल मीडियावरून दिली.
हल्ल्याच्या प्रयत्नाचे कृत्य प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. आपल्या समाजात तशा निषेधार्ह कृत्याला कुठलाही थारा नाही. गवई यांनी दाखवलेल्या धैर्य, संयमाची मी प्रशंसा करतो. त्यातून त्यांची न्यायविषयक मुल्यांप्रती असणारी वचनबद्धता अधोरेखित होते.
राहुल गांधी काय म्हणाले?
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवरी पोस्ट करत म्हटलं की, सरन्यायाधीशांवरील हल्ला हा न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि संविधानाच्या आत्म्यावर झालेला आघात आहे. या प्रकारच्या द्वेषाला देशात मुळीच जागा नाही. त्याचा कठोर निषेध व्हायला हवा’.





