“पराभवानंतर मोदी सहज सत्ता सोडणार नाहीत” ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

Nitin Raut । लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. मात्र या मतमोजणीच्या दिवशी स्टँगरुममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम बदलणार तर नाहीत ना? अशी शंका काँग्रेसने व्यक्त केलीय. म्हणूनच काँग्रेसच्या हाय कमांडने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. त्यासोबतच स्टँगरुमवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केलाय.
प्रशासनाच्या भूमिकेवर आम्हाला शंका Nitin Raut ।
याविषयी बोलताना नितीन राऊत यांनी,” निवडणूक आयोग सरकारचा आणि त्यापेक्षाही जास्त मोदींचा पाठीराखा आहे. निवडणूक आयोगाने गेल्या काही दिवसात अनेक वेळेला स्वतःचेच नियम पायदळी तुडवले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सरकारच्या दबावात असलेल्या प्रशासनाच्या भूमिकेवर आम्हाला शंका असल्याचे नितीन राऊत म्हणाले आहेत. एवढंच नाही तर पराभूत झाल्यानंतर मोदी एवढ्या सोप्यारीत्या सत्ता हस्तांतरित करणार नाही, ते काही ना काही गडबड करतील,” असा दावा राऊतांनी केलाय.
मोदी पराभूत झाल्यानंतर गडबड करतील Nitin Raut ।
नितीन राऊत यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पराभूत झाल्यानंतर मोदी सत्ता हस्तांतरित करणार नाही, ते काहीतरी गडबड करतील. असेही राऊत यांनी म्हटले आहे. प्रचंड बहुमताच्या नंतरही 1989 मध्ये पराभव झालेल्या राजीव गांधी यांनी सहजरित्या सत्ता सोडली होती. मात्र मोदी तसं करतील असं आम्हाला वाटत नसल्याचेही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, अमित शहा यांनी निवडणूक सुरू असताना अनेक जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधले, हे नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोपही नितीन राऊत यांनी केलाय.





