“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack | जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.
या हल्ल्याची माहिती मिळताक्षणी सुरक्षा यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत सदर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहिम हाती घेतली. या हल्ल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना यापूर्वीही घडायच्या. मोदी सरकार इतकं बलवान ठरलं की, 370 हटवल्यानंतर जम्मूमध्ये दहशतवादी हल्ले होऊ लागले, जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. आजही जम्मूतच एक हल्ला झाला, ज्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी खूनी खेळ खेळत होते. आजही काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकत नाहीत. मोदीजी, पंडित घरी कधी परतणार?,” असा सवालही राऊतांनी केला आहे.
पहले आतंकी घटनायें कश्मीर की घाटी में होती थी . मोदी सरकार इतनी मज़बूत साबित हुई कि 370 हटने के बाद आतंकी हमले जम्मू संभाग में होने लगे जो पहले कभी नहीं होते थे .
आज भी जम्मू संभाग में ही हमला हुआ है जिसमें दस लोगों की मौत हो गयी.
मोदी शपथ ले रहेथे और जम्मू में आतंकवादी खुनी खेल…— Sanjay Raut (@rautsanjay61) June 9, 2024
नेमकं काय घडलं?
दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार केला. गोळीबारानंतर शिव खोरी मंदिराकडून कटराकडे जाणारी प्रवासी बस खोल दरीत पडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास ही घटना घडली. यात्रेकरुंची ही बस शिव खोडी मंदिरात दर्शनासाठी जात होती. ही बस पोनी येथील तेरियात गावातून निघाली होती. मात्र अचानक झालेल्या या गोळीबारच्या घटनेत 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले आहेत. Jammu & Kashmir Terrorist Attack |
राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर ट्वीट करताना लिहिलं आहे की, “जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे. ही लाजिरवाणी घटना म्हणजे जम्मू-काश्मीरमधील चिंताजनक सुरक्षा परिस्थितीचे खरे चित्र आहे. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. मी सर्व शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि ते लवकरात लवकर बरे होवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.” Jammu & Kashmir Terrorist Attack |
हेही वाचा :
मुंबईच्या विक्रोळीत भीषण अपघात ; स्लॅब कोसळून एका मुलासह दोघांचा मृत्यू





