मोदी-पुतिन यांच्या मैत्रीने अमेरिकेचा तिळपापड ? ; दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास अन् चर्चा

Modi-Putin friendship। पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोघेही सध्या चीनमधील तियानजिन याठिकाणी दाखल झाले आहेत. आज सोमवारी पंतप्रधान मोदी-पुतिन आणि शी जिनपिंग यांची भेट झाली. त्यानंतर आणखी एक छायाचित्र समोर आले, ज्यामुळे अमेरिकेला हेवा वाटेल. चीनमधील तियानजिन येथे मोदी आणि पुतिन यांनी त्यांच्या द्विपक्षीय बैठकीसाठी एकाच कारमधून प्रवास केला. त्याचा छायाचित्रही समोर आला आहे, जो पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हे फोटो दोन्ही नेत्यांमधील वैयक्तिक संबंध दर्शवितो. शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेनंतर लगेचच हा फोटो समोर आला आहे.
पंतप्रधान मोदींनी छायाचित्र शेअर केले Modi-Putin friendship।
पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवास करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुतिन यांच्यासोबतच्या प्रवासाचा फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिले, “SCO शिखर परिषदेच्या ठिकाणी भेटीनंतर, राष्ट्रपती पुतिन आणि मी एकत्र आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी गेलो. त्यांच्याशी झालेल्या गप्पा नेहमीच ज्ञानवर्धक असतात.” दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली.
SCO शिखर परिषदेपूर्वी, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हात मिळवले आणि एकमेकांना मिठी मारली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर संभाषणाचा एक फोटो शेअर केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “राष्ट्रपती पुतिन यांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.”
After the proceedings at the SCO Summit venue, President Putin and I travelled together to the venue of our bilateral meeting. Conversations with him are always insightful. pic.twitter.com/oYZVGDLxtc
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025
दहशतवादाविरुद्ध पंतप्रधान मोदींचा कडक संदेश
यापूर्वी एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत दहशतवादाविरुद्ध कडक संदेश दिला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवाद आणि अतिरेकीवाद हे मानवतेसाठी एक सामान्य आव्हान आहे. जोपर्यंत हे धोके कायम आहेत तोपर्यंत कोणताही देश किंवा समाज स्वतःला सुरक्षित मानू शकत नाही.”
अमेरिकेच्या शुल्कादरम्यान बैठक Modi-Putin friendship।
भारत आणि अमेरिकेतील व्यापारावर कर दबाव असताना पंतप्रधान मोदींची टियांजिनमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट झाली. या बैठकीची वेळ महत्त्वाची आहे, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर ५०% कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ सदस्यांनी रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर वारंवार टीका केली आहे. अमेरिकेचा असा युक्तिवाद आहे की अशा व्यवहारांद्वारे भारत अप्रत्यक्षपणे युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवायांना पाठिंबा देत आहे.





