VIDEO : गुजरात दौऱ्यावर गेलेल्या केजरीवालांसमोरच ‘मोदी, मोदी’ अशी घोषणाबाजी अन्…

Updated On:

वडोदरा – पंजाबमध्ये काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावत बहुमत प्राप्त करणारा आम आदमी पक्षाचा झाडू आता भाजपचा सफाया करण्यासाठी मोदींच्या गुजरातमध्ये सक्रिय झाला आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार केला असून यासाठी त्यांचे गुजरात दौरे सुरु आहेत.

वडोदरा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी केजरीवाल आज येथे दाखल झाले होते. विमानतळावरून बाहेर पडत असताना केजरीवाल यांचे स्वागत ‘मोदी, मोदी’ घोषणांसह झाले. ( modi modi sloganns infront of arvind kejriwal )

वडोदरा विमानतळावरून केजरीवाल बाहेर पडत असताना तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही समर्थक जमले होते. केजरीवाल बाहेर येताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करण्यास सुरुवात केली. केजरीवाल गुजरातेत आल्याने मध्यमप्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला होता. अशातच ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा सुरु असल्याने ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

‘बाळासाहेबांचा मुलगा आहे किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?’ विचारणाऱ्या कदमांना अंधारेंनी सुनावलं

केजरीवाल यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारत टाऊन हॉल येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे केजरीवाल काहीसे ओशाळल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसले.

दरम्यान, केजरीवाल यांच्याकडून गुजरातविधानसभा निवडणुकांमध्ये दिल्ली मॉडेलच्या आधारे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ३०० युनिटपर्यंत मोफत विद्युतपुरवठा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, आरोग्य सुविधा अशा दिल्ली व पंजाबमध्ये मतदारांना आकर्षित केलेल्या योजनांची घोषणा केजरीवाल यांनी गुजरातमध्ये देखील केली आहे. ( modi modi sloganns infront of arvind kejriwal )

गुजरात विरुद्ध दिल्ली मॉडेल ( PM Modi vs Kejriwal )

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात गुजरात मॉडेलचा गवगवा झाला होता. त्याचा थेट फायदा भाजपला निवडणुकांमध्ये होऊन काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली होती. हिंदू आणि विकास या दोन्हींची सांगड घालणाऱ्या मोदींच्या गुजरात मॉडेलला हिंदी पट्ट्यात लोकप्रियता मिळाली आहे. सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७० हटवणे, तीन तलाक, राम मंदिराची उभारणी हे मुद्देही आता मोदींच्या मॉडेलमध्ये जोडले गेले आहेत.

भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार – जयंत पाटील

तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलचीही देशभरात चर्चा आहे. शाळांचे आधुनिकीकरण मोफत शिक्षण, वीज आणि आरोग्य सेवा हे केजरीवालांच्या दिल्ली मॉडेलचे स्तंभ आहेत. दिल्लीनंतर केजरीवालांनी याच मॉडेलच्या आधारावर पंजाब काबीज केले आहे. काही दिवसांपूर्वीच मोदींनी केजरीवालांचे नाव न घेता त्यांच्या मॉडेलवर ‘रेवडी कल्चर’ अशी टीका केली होती.

मोदींच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी, मोदी श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ करतात ते खरे रेवडी कल्चर असल्याचं म्हंटलं होत. या घडामोडी पाहता  गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन्ही मॉडेलची देखील कसोटी लागणार आहे. ( modi modi sloganns infront of arvind kejriwal )

आणखी संबंधित बातम्या

Narendra Modi : जगातील प्रतिभेला भारताकडे आकर्षित करा; अंतराळ स्टार्टअप्सना मोदींचे आवाहन

2026-08-23 17:09:45

Narendra Modi : जगातील प्रतिभेला भारताकडे आकर्षित करा; अंतराळ स्टार्टअप्सना मोदींचे आवाहन

National Space Day: 'नव्या युगाची सुरुवात' म्हणत पंतप्रधानांनी शेअर केला राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त खास व्हिडिओ

2026-08-23 14:40:16

National Space Day: 'नव्या युगाची सुरुवात' म्हणत पंतप्रधानांनी शेअर केला राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त खास व्हिडिओ

Seva Sankalp Abhiyan : भाजपकडून 17 सप्टेंबरपासून देशव्यापी 'सेवा संकल्प अभियान'; कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

2026-08-22 22:25:24

Seva Sankalp Abhiyan : भाजपकडून 17 सप्टेंबरपासून देशव्यापी 'सेवा संकल्प अभियान'; कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

Sanjay Raut : "लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं, पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल" : संजय राऊतांचं स्फोटक वक्तव्य

2026-08-20 11:30:08

Sanjay Raut : "लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं, पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल" : संजय राऊतांचं स्फोटक वक्तव्य

Subhash Ghai : "...तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण

2026-08-20 09:27:10

Subhash Ghai :  "...तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा"; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण