Supriya Sule: संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपावली आहे. सिंगापूर देशासोबत व्यापारी करार होणार असून यात चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये त्यांना सहभागी करण्यात आलं आहे. परदेशात व्यापार कराराबाबत संसदीय मैत्री समितीमध्ये महाराष्ट्रातून विरोधी गटातील खासदार सुप्रिया सुळे यांना संधी देण्यात आली. याआधीही सुप्रिया सुळे यांची निवड ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात करण्यात आली होती. या शिष्टमंडळाला जगभरात पाठवण्यात आलं होतं. ज्यात विरोधी गटातून खासदार सुप्रिया सुळे यांचा सहभाग होता. याआधी सुप्रिया सुळे यांनी संसदेत माहिती तंत्रज्ञान, गृह व्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या स्थायी समित्यांवर काम केलं आहे. वेगवेळ्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी आणि धोरणात्मक चर्चेसाठी स्थापन होणाऱ्या संसदीय मैत्री गटांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ६४ देशांसोबत संसदीय मैत्री गटांची स्थापना केली. त्यापैकी सुप्रिया सुळे यांच्याश काही गटांचे नेतृत्व वरिष्ठ विरोधी पक्षनेत्यांकडे सोपवले आहे. Supriya Sule: Om Birla विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश यात विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी काँग्रेसचे शशी थरूर (फ्रान्स), पी. चिदंबरम (इटली), के. सी. वेणुगोपाल (पोर्तुगाल), मनीष तिवारी (ऑस्ट्रेलिया) आणि गौरव गोगोई (फिलिपिन्स), डीएमकेच्या के. कनिमोळी (ग्रीस), तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन (चिली) आणि अभिषेक बॅनर्जी (अल्जेरिया), शिवसेना-यूबीटीचे अरविंद सावंत (मोरोक्को) राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (सिंगापूर), एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (ओमान), समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (जपान) आणि राम गोपाल यादव (इजिप्त), आम आदमी पक्षाचे संजय सिंह (कॅरिबियन देश) तसेच आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन (मादागास्कर) हे संबंधित गटांचे अध्यक्ष असतील. Vijay Rashmika: पूल पार्टी ते कॅंडललाइट डिनर! विजय-रश्मिकाच्या लग्नसोहळ्याची रंगतदार सुरुवात तर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची जपानसाठीच्या मैत्री गटावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या गटाचे नेतृत्व अखिलेश यादव करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांनाही या गटांमध्ये स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसचे निलंबित खासदार मणिकम टागोर (इंडोनेशिया), गुरजीत सिंग औजला (इटली), हिबी ईडन (सिंगापूर), अमरिंदर सिंग राजा वारिंग (युनायटेड किंगडम), प्रशांत पडोळे (त्रिनिदाद आणि टोबॅगो), डीन कुरियाकोस (सौदी अरेबिया) आणि सी. किरण कुमार रेड्डी (दक्षिण कोरिया) यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. सीपीआय(एम)चे एस. वेंकटेशन यांची क्युबासाठीच्या संसदीय गटावर नियुक्ती करण्यात आली आहे. Supriya Sule हेही वाचा: Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधकांकडून झिरवाळांविरोधात आंदोलन केलं जाणार