Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, विरोधकांकडून झिरवाळांविरोधात आंदोलन केलं जाणार
Maharashtra Budget Session: विरोधकांकडून आज झिरवाळांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. तसंच झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सोमवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने झाली. त्यावेळी देवव्रत यांनी सरकारच्या वाटचालीचा आलेख मांडला. त्यानंतर सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अनेक नेते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तृत्ववान आणि शब्दाला जागणाऱ्या अजितदादांच्या रुपाने मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरण तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आज झिरवाळांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. तसंच झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर औषध आणि प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागातील लाचखोरीचे प्रकरण बाहेर आलं आहे. त्यानंतर आता झिरवळ यांच्या कार्यालयात लाच घेतलेल्या राजू ढेरेंगेला अखेर अन्न आणि औषध प्रशासन विभागातून निलंबित करण्यात आलं आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून राजू ढेरेंगे हा मंत्री आस्थापनेवर कार्यरत होता. तर झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडेंनाही अन्न आणि औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करण्यात आलं आहे.
याशिवाय 35 हजारांची लाच घेण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लिपिक राजेंद्र ढेरेंगे ला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने ढेरेंगेला जामीन मंजूर केला. तर लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लीन चिट दिली आहे. मंत्र्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने झिरवाळ यांचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र यावरून आता विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. Maharashtra Budget Session:
हेही वाचा:






