Modi 3.O : गृह-संरक्षण-परराष्ट्र मंत्रालयावर भाजपचे वर्चस्व, जाणून घ्या मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला मिळाली कोणती जबाबदारी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप सोमवारी जाहीर झाले. त्यानुसार, प्रमुख केंद्रीय मंत्र्यांची भूमिका जैसे थे ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये अमित शहा (गृह), राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामन (अर्थ) आणि एस.जयशंकर (परराष्ट्र व्यवहार) यांच्याकडे टॉप फोर मंत्री म्हणून पाहिले गेले. त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कायम ठेवण्यात आली आहे. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये समावेश असणारे नितीन गडकरी (रस्ते वाहतूक) आणि धर्मेंद्र प्रधान (शिक्षण) हेही मागील मंत्रालयांचे कामकाज पुढे चालवतील.
देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींनी सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी रविवारी शपथ घेतली. त्यांच्या समवेत ७१ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. स्वत: मोदी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने याआधी सातत्याने धक्कातंत्राचा अवलंब करत काही अनपेक्षित निर्णय घेतले.
त्या कार्यपद्धतीचा अवलंब खातेवाटपात होईल का याविषयी मोठी उत्सुकता होती. मात्र, प्रमुख मंत्र्यांची खाती न बदलण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. त्यामुळे अर्जुनराम मेघवाल आणि सर्वानंद सोनोवाल यांच्याकडील जबाबदारीही कायम राहिली आहे. ते यापुढेही अनुक्रमे कायदा आणि जहाज बांधणी मंत्रालये सांभाळतील. किरेन रिजीजू यांचे खाते मात्र बदलण्यात आले आहे. याआधी त्यांच्याकडे पृथ्वी विज्ञान विभागाची जबाबदारी होती. आता ते संसदीय कामकाज खाते सांभाळतील.
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडेही महत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. नड्डा आरोग्य, तर खट्टर ऊर्जा मंत्रालयांचे कामकाज पाहतील. शिवराज नवे कृषी आणि ग्रामविकास मंत्री म्हणून कार्य करतील.
केंद्रीय मंत्रीमंडळ –
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
अमित शहा – गृहमंत्री; सहकार मंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
ज्योतिरादित्य शिंदे – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री
राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती
जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री
पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री
निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री





