स्विगी इन्स्टामार्टवरून मिळणार मोदक
Updated On:

मुंबई – महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अशा परिस्थितीमध्ये स्विगी इन्स्टामार्ट कंपनीने गणेश भक्तांना मोदक उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिराचे मोदक ऑर्डर केल्यानंतर दहा मिनिटात उपलब्ध होणार आहे.
ही सुविधा 27 ऑगस्ट रोजी मुंबईत आणि पुण्यात उपलब्ध करण्यात आली असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. ज्यांना गर्दीमुळे मंदिरात जाता येणार नाही अशांना हा मोदक उपलब्ध होऊ शकेल असे इन्स्टामार्ट कंपनीचे उपाध्यक्ष अर्जुन चौधरी यांनी सांगितले.
टॅग्स:





