SRK ला शुभेच्छा देण्यासाठी जाणं चाहत्यांना पडलं महागात ! शाहरूखच्या बंगल्याबाहेरील गर्दीत 17 जणांचे मोबाईल चोरीला

मुंबई – बॉलीवूड सुपरस्टार शाहारूख खान (Shahruk khan) याच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीत 17 जणांचे मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.शाहरुखला जन्म दिवसानिमित्त शुभेच्छा (SRK Birthday) देण्यासाठी नेहमीप्रमाणे चाहते त्याच्या घराबाहेर जमा होत असतात. याच दरम्यान मोबाईल चोरीचा प्रकार समोर आला आहे. (Mannat)
गुरुवारी सकाळच्या सुमाराला ही घटना घडली. त्यावेळी शाहरूख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. वांद्रे पोलिसांनी (Wandre police) गुरुवारी या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.यातील प्रथम तक्रार एका राष्ट्रीय वृत्तपत्रातील 23 वर्षीय छायाचित्रकाराने केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या तक्रारीनुसार तो मित्रांसह वांद्रे बॅंडस्टॅंडवर (wandre bandstand) आला आणि मन्नत बंगल्याच्या बाहेरच्या गर्दीत सामील झाला. (Mobile phones stolen)
सकाळी 12.30 च्या सुमारास तक्रारदाराच्या लक्षात आले की त्याने खिशात ठेवलेला मोबाईल फोन गायब आहे. त्यावेळी इतरांचेही फोन गायब झाल्याची बाब लक्षात आली. ते या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना तेथे अशाच तक्रारी दाखल करण्यासाठी अन्यही बरेच लोक आले होते. पोलिसांनी या सर्व तक्रारी एकत्र करून गुन्हे दाखल केले. (Mannat bungalow)
दरवर्षी, 2 नोव्हेंबर रोजी शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर शेकडो चाहते त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमतात.शाहरूख खानही त्याच्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी त्याच्या बंगल्यातून बाहेर येऊन उपस्थितांना अभिवादन करतो. त्याच्या बंगल्याच्या बाहेर मोठा सुरक्षा बंदोबस्तही तैनात असतो.





