शाहरुख खाननंतर आता ॲटलीच्या आगामी चित्रपटात झळकणार सुप्रसिद्ध अभिनेता

Atlee New Movie | बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सुपरहीट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. विशेष म्हणजे दिग्दर्शक ॲटलीने पदार्पणातच बॉलिवूडवर यातून स्वत: ची दमदार कामगिरी दाखवली. या चित्रपटाच्या यशानंतर आता ॲटली नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस होणार आहे. शाहरुखसोबत सुपरहिट चित्रपट केल्यानंतर आता तो सलमान खानसोबत काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ॲटलीचा पुढचा चित्रपट साऊथचा सुपरस्टार अभिनेता ॲटलीसोबत असणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. यातच आता स्टार दिग्दर्शक ॲटली पुढचा चित्रपट बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत करणार आहे. सलमान खानने या प्रकल्पासाठी होकार दिला असून ॲटली चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत.
या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सच्या हाती असण्याची शक्यता असून या चित्रपटासाठी सलमान खानला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यात सलमानबरोबर आणखी कोणते कलाकार या सिनेमात दिसणार आहेत? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच याची सगळी माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. Atlee New Movie |
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान ‘टायगर-3’ चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता चाहते त्याच्या पुढील प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा केली होती.
हेही वाचा:
कमल हसन यांनी सांगितलं किस्सा,’शोलेमध्ये टेक्नीशियन म्हणून काम केले…’





