मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अमोल मिटकरींची कार; Video आला समोर

अकोला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोला शहरातील रेस्ट हाऊसमध्ये अमोल मिटकरी थांबलेल्या दालनात कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच रेस्ट हाऊसच्या बाहेर उभी असलेली अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली. तसेच मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
मिटकरींनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षरीत्या टीका करत सुपारी बहाद्दर म्हणून म्हटलं होतं. तसंच, महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी ठरलेल्यांनी अजित पवारांबद्दल बोलू नये, असा इशारा अमोल मिटकरींनी दिला होता.तर NDRF चा लाँग फॉर्म माहीत नसेलेल्या व्यक्तीने आपती व्यापस्थपनावर बोलण म्हणजे सर्वात मोठा जोक आल्याचा टोलाही मिटकरींनी यावेळी लगावला होता.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना धरणातून इतकं पाणी आलं, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली होती.





