हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांंना मनसेचा टोला; ‘हिंदीहृदयसम्राट’ म्हणत शेअर केला फोटो

DEVENDRA FADNAVIS | राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. दोन्ही पक्षाकडून 5 जुलै रोजी विराट मोर्चाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी फडणवीसांना ‘मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी’ असे म्हटले आहे.
भाजपला मनसेकडून ट्विटर पोस्टच्या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांची सक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णायाविरोधात राज्यातील अनेक पक्ष एकत्र आली आहेत. इतकेच काय तर, महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हिंदीवरून महायुतीमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.
” हिंदीहृदयसम्राट ” pic.twitter.com/pDwSnOz1It
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 29, 2025
अमेय खोपकर यांचे कलाकरांना आवाहन
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मराठी कलाकारांना कृतज्ञतेची भावना ठेवत पाच जुलै रोजी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या मराठी भाषेमुळे प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण कृतज्ञता म्हणून सर्वांनी पाच जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया 5 जुलैला मराठी मालिका चित्रपट यांच्या शूटिंग बंद ठेवावे अशी विनंती असल्याचे पोस्टमध्ये म्हटलं आहे. मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. DEVENDRA FADNAVIS |





