Raj Thackeray : रायगडावरून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरूवात; राज ठाकरे म्हणाले, ‘गुलाल उधळत शिवतीर्थावर या…’
Raj Thackeray : मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्ष सदस्य नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्च 2026 रोजी 20 वर्धापन साजरा केला जात आहे. यानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे सहकुटुंब किल्ले रायगडावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी रायगडावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले. यावेळी मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
या सोहळ्यादरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray ) म्हणाले की, “आज 9 तारखेला वर्धापन दिन आहे आणि 19 तारखेला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्यामुळे दोन वेळेस बोलण्यापेक्षा जे काही बोलायचे आहे ते 19 तारखेला एकदाच बोलून टाकून, असे मी ठरवले आहे. तसेच पक्ष सदस्य नोंदणी बऱ्याच दिवसांपासून करायची होती. त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्ष सदस्य नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.” Raj Thackeray
तर मन सैनिकांना आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की, “अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. नुसते सदस्य नाही तर त्यांना सक्रिय सदस्य व्हायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या वर्दळीच्या जागा आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स लागली पाहिजेत. तुम्ही लोकांपर्यंत गेले पाहिजे, लोकांशी बोलले पाहिजे. हजारो लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. त्यांना तुम्ही सदस्य करून घ्या,” असे आवाहन त्यांनी यावेळी मनसैनिकांना केले. Raj Thackeray
आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावर पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात आपण करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जा. येत्या 19 तारखेला माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी गुलाल उधळत शिवतीर्थावर यावे. सदस्य नोंदणीच्या उपक्रमाला सुरुवात झाली असे मी जाहीर करत असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी राजकीय विषयावर भाष्य केल्याचे टाळले, त्यामुळे 19 तारखेला गुढीपाडव्याचा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Raj Thackeray
हेही वाचा:






