कोल्हापुरमध्ये मनसेच्या 2 नेत्यांना अटक; ‘या’ प्रकरणी दाखल केला गुन्हा

कोल्हापूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरमध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारी संस्थेच्या बँक अध्यक्षांसह उपाध्यक्षाला मारहाण केल्या प्रकरणी आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून त्या दोघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले आणि मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांना अटक केली आहे.
काय घडले नेमके?
रंकाळा परिसरात असणाऱ्या श्री साईदर्शन जनता अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी इथल्या शाखेत मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसवेक यांच्यासह शहराध्यक्ष आणि इतरांनी बँकेच्या केबिनमध्ये जाऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना मारहाण केली. सोमवारी ५ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. बँकेचे अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना शिवीगाळ आणि मारहाण कऱण्यात आली. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, समर्थ कशाळकर, प्रसाद पाटील, विकास कांबळे यांच्यासह चार ते पाच जणांनी हि मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
यामध्ये जबरदस्तीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आल्याचं म्हंटले आहे. अश्लील शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देत कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच संस्थेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआरसुद्धा आरोपींनी नेल्याचं तक्रारीत म्हटलंय. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





