MNS On Alibaba Ani Chalishitale Chor movie : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेने नेहमीच आक्रमक भूमिका घेत चित्रपटांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आता देखील मनसेने मराठी चित्रपटांची होणार पायरसी रोखण्यासाठी आपली भूमिका मांडली आहे. पायरसीमुळे चित्रपटाचे होणार नुकसान थांबवण्यासाठी मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी चित्रपटांच्या पायरसीबाबत चिंता व्यक्त करत सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे.
‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची लगेच पायरसी झाल्याचे पाहायला मिळाले.यावरूनच मनसे चांगलीच आक्रमक झाली. प्रेक्षकांनी चित्रपट किंवा नाटक हे थेटरमध्ये जाऊन पहावे, पायरसीच्या या लढ्यात प्रेक्षकांनी साथ द्यावी असे आवाहन अमेय खोपकर यांनी केले आहे. | MNS On Alibaba Ani Chalishitale Chor movie
“‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, पण त्याचवेळी या चित्रपटाची कॉपी लीक झाली असून या पायरसीमुळे चित्रपटाचं नुकसान होऊ शकतं. मराठी प्रेक्षकांना आवाहन आहे की त्यांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघावा. या पायरसीला आळा बसावा यासाठी आम्हीसुद्धा सायबर पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. पायरसीविरुद्धच्या या लढ्यात प्रेक्षकांनीही साथ द्यावी ही विनंती” असं खोपकर यांनी म्हंटल आहे. | MNS On Alibaba Ani Chalishitale Chor movie
‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय, पण त्याचवेळी या चित्रपटाची कॉपी लीक झाली असून या पायरसीमुळे चित्रपटाचं नुकसान होऊ शकतं. मराठी प्रेक्षकांना आवाहन आहे की त्यांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघावा. या पायरसीला आळा बसावा यासाठी आम्हीसुद्धा…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 4, 2024
या विषयांसाठी सरकार दरबारी जाणार
“सेन्सॉरशिपपासूनच मराठी चित्रपटांची गळचेपी सुरू होते. सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मराठी चित्रपटांना प्रचंड त्रास दिला जातो. ज्यांना मराठी कळत नाही, ज्यांना मराठी समजत नाही असे परीक्षक सेन्सॉर बोर्डात बसले आहेत. हे दोन विषय घेऊन आम्ही लवकरच सरकार दरबारी जाणार असल्याचे देखील खोपकर यांनी यावेळी सांगितले. | MNS On Alibaba Ani Chalishitale Chor movie
श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लोकसभा लढणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत ?
‘सन ऑफ सरदार 2’मध्ये अजय देवगणसोबत झळकणार सोनाक्षी सिन्हा? नवी अपडेट समोर