MLC Election : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीपूर्वी (MLC Election) महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवर भाजपने अधिकृतपणे दावा ठोकला आहे. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने ही जागा भाजपलाच (MLC Election) मिळावी, अशी आक्रमक मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी थेट प्रदेश कार्यकारिणीकडे केली आहे. भाजपकडे १९० मतदार असल्याचा हवाला देत स्थानिक नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. भाजपचा दावा का? एकूण ६२२ मतदारसंघांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे लोकशाही मूल्यांनुसार संख्याबळाचा आदर करून ही जागा भाजपला द्यावी, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांचा आहे. MLC Election शिंदे सेनेत अंतर्गत स्पर्धा दुसरीकडे, ही जागा सध्या शिंदे गटाकडे असल्याने पुन्हा शिंदे सेनेकडून उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षातील स्थानिक नेत्यांनी केली आहे. उमेदवारीसाठी शिंदे गटात एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने आधीच पक्षात जोरदार अंतर्गत स्पर्धा सुरू आहे. त्यात आता भाजपने दावा ठोकल्याने शिंदे सेनेतील अडचणीत अधिक वाढ झाली आहे. नाशिक विधानपरिषद (MLC Election) मतदारसंघातील पक्षीय बलाबल (एकूण ६२२ मतदार) एकूण जागा – ६२२ भाजप – १९० शिंदे सेना – १७१ राष्ट्रवादी ( AP ) – १०७ ठाकरे सेना – ४५ इस्लाम पार्टी – ३५ एमआयएम – २१ काँग्रेस – १३ इतर / अपक्ष – ४१ महायुतीतील या रस्सीखेचीमुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या उच्चस्तरीय नेत्यांकडून लवकरच या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.