आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करण्याऱ्यांना देव माफ करणार नाही; शहाजीबापू पाटील यांची टीका

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. खानापूर-आटपाडीचे माजी आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न असलेल्या टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला. यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांचे दहा-बारा पोस्टर्स लागतात, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात तिळमात्र शंका नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं. ठाकरे गटाचे नेते आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप करतात, पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव माफ करणार नाही असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
मविआला लगावला टोला
मविआने भंगार गोळा करायला सुरुवात केली आहे असा टोला महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या इन्कमिंगवर शहाजीबापू पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला भेटत नव्हते असेदेखील शहाजीबापू पाटील यावेळी म्हणाले.





