आमदार संतोष बांगरांचा पाय खोलात?; समर्थकाकडून महिला पदाधिकाऱ्याची शिवीगाळ केल्याची तक्रार; उद्धव ठाकरे म्हणाले “एक काम कर…”

Updated On:

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत  आले आहेत. त्यांच्या एका समर्थकामुळे बांगर आता वादात अडकणार असल्याची शक्यता वारवण्यात येत आहे. या सर्वात विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.

संतोष बांगर यांच्या कथित समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचं ऐकू येत आहे.

फेसबुकवरील एका पोस्टबाबत जाब विचारताना हा समर्थक अयोध्या पोळ यांना वारंवार हिंगोलीत येण्याचं आवाहन देत असल्याचंही यात दिसत आहे. ‘संतोष बांगर तुझा बाप आहे’, अशा भाषेत हा समर्थक त्यांच्याशी संवाद साधतो.

दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळ यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

आणखी संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी