MLA Mauli Katke – हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी परिसरात आमदार माऊली कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांची रस्ते विकासकामे मार्गी लागली असून, परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लेखाशिर्ष 3054-3611-31 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेसाठी जिल्हा परिषदेला भरीव निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डोमखेल परिसरात महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून, नुकताच भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पडला. या योजनेअंतर्गत डोमखेल वस्ती ते वडजाई रस्ता (ग्रा. मा. 96) – 70 लाख, पुणे मनपा हद्द ते बाईफ रोड वाडा-वडजाई रस्ता (ग्रा. मा. 95) – 80 लाख आणि कांचनपुरम सोसायटी ते पुणे मनपा हद्द बाईफ रोड (ग्रा. मा. 95) – 1 कोटी अशी एकूण 2 कोटी 50 लाख रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या विकासकामांमुळे परिसरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारून वाहतूक अधिक सुकर व सुरक्षित होणार आहे. तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. यावेळी आमदार माऊली कटके यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत भविष्यातही अशाच विकासकामांसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच डोमखेल, आव्हाळवाडी, वडजाई परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “डोमखेल, आव्हाळवाडी, वडजाई परिसरातील रस्त्यांसाठी आमदार माऊली कटके यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे.” – अविनाश सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली