सोनईच्या संवाद मेळाव्यातून आमदार गडाखांच्या राजकिय चर्चेला अखेर मिळाला पुर्णविराम..!

राजेंद्र वाघमारे
नेवासा – राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख – पाटील उबाठा सेनेला जयमहाराष्ट्र करुन जय श्रीरामचा नारा देत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या तालुक्यातील राजकारणात जोरदारपणे उठविल्या जात असतांना नुकताच उद्धव ठाकरे यांनी सोनई (ता.नेवासा) येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेवून निष्ठा काय असते? हे आमदार गडाखांनी दाखवून दिल्याचे ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगून आमदार गडाखांवर स्तुतीसुमनांचा भडिमार केला.
आमदार गडाखांनीही लोकसभेला पक्ष जो उमेदवार देईल ? त्या उमेदवाराचे काम आपण करणार असल्याची ग्वाही आमदार गडाखांनी ठाकरे यांना दिल्यामुळे अखेर आमदार गडाखांच्या राजकिय भूमिकेच्या चर्चेला पुर्णविराम मिळ्याचे सोनई येथे झालेल्या ठाकरे यांच्या जाहिर सभेमुळे दिसून आल्याने पक्ष बदलाच्या भुमिकेला अखेर पडदा पडला आहे.
सोनई येथे झालेल्या संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेना पक्ष संकटात असतांना त्यांनी सेनेवर आपुलकी दाखवत पक्षनिष्ठा काय असते हे दाखवून दिलेली आहे ते तिकडे गेले असते तर त्यांनाही मंञीपद मिळाले असते ? माञ दिलेला शब्द पाळणारे दिग्गज नेते म्हणून आमदार गडाखांचा नामोल्लेख करत ठाकरे यांनी आमदार गडाखांचे कौतुक केले आणि तालुक्यात गेल्या तीन – चार महिण्यापासून सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाल्याने ठाकरे यांच्या जाहिर सभेतून गडाखांची राजकिय भूमिका ठाकरेंच्या संवाद मेळाव्यातून स्पष्ट झालेली आहे त्यामुळे तालुक्यात आमदार गडाखांच्या पक्ष बदलाच्या होणाऱ्या राजकिय चर्चेला अखेर ब्रेक लागला आहे.





