वाघोली – शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी वाघोली मधील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी दुचाकीवरून प्रवास केला. या प्रवासाची सध्या वाघोलीत चर्चा होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय सातव पाटील यांच्या सोबत दुचाकीवरून आमदार अशोक पवार यांनी गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावत मोठ्या जल्लोषात गणेश उत्सवाचा आनंद घेतला आहे. यावेळी प्रत्येक मंडळांनी आमदार अशोक पवार यांना रंगबिरंगी बांधलेल्या फेट्यांची देखील वाघोलीत चर्चा होऊ लागली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा दुचाकीवरून प्रवास नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरे गट यांचे नेते आमदार अशोक पवार यांच्या साथीला असल्याने या दुचाकी प्रवासाने अनेकांच्या भुवया उंचावू लागल्या आहेत. कोट्यावधी रुपयांच्या महागड्या गाड्या असून देखील दुचाकीवरून आमदार अशोक पवार यांचा झालेला प्रवास साधेपणाचे आदर्श उदाहरण बनला आहे. आमदार अशोक पवार यांचा साधेपणा वाघोलीत चर्चेला आला आहे.