Mithun Chakraborty Hospitalised। ‘मिथुन दा’ यांना ‘ब्रेन स्ट्रोक’; कोलकाता रुग्णालयात दाखल

Mithun Chakraborty Hospitalised। अभिनेता-राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना गेल्या काही तासांपूर्वी पासून छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा
प्रिती झिंटाचा नो मेकअप लूक व्हायरल
मिथुन चक्रवर्ती 73 वर्षांचे आहेत. आज सकाळी मिथुन दा यांना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. थोडी अस्वस्थताही जाणवत होती. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या बातमीमुळे मिथुन दाचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे. ते लवकर बरे व्हावे यासाठी बॉलीवूड कलाकारांसह चाहते प्रार्थना करत आहे.
हेही वाचा
ऋचा आणि अली फजल लवकरच गुड न्युज देणार!
दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे.
इतके प्रेम आणि आदर दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे. हा पुरस्कार माझ्या जगभरातील चाहत्यांसाठी आहे ज्यांनी मला निस्वार्थ प्रेम दिले आहे. माझा हा पुरस्कार सर्व हितचिंतकांना जातो.





