Mithila Palkar: अभिनेत्री मिथिला पालकर मराठी आणि बॉलीवूड चित्रपटानंतर आता तामिळ चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ‘ओहो एन्थान बेबी’ या चित्रपटातून ती तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सध्या ती या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून चाहत्यांनीही तिच्या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.
तामिळ चित्रपटातील पदार्पणाबद्दल बोलताना मिथिला म्हणाली की, “मला साउथमध्ये काम करायला खूप आवडते. आता मी ‘ओहो एन्थान बेबी’ मधून तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. तामिळ चित्रपटात काम करत असताना आनंद, उत्साह तर आहेच पण थोडस दडपण वाटत आहे. मी आता या चित्रपटाबद्दल फार काही सांगू शकत नाही, पण प्रेक्षकांना फार काळ प्रतीक्षा करायला लावणार नाही.”
‘ओहो एन्थान बेबी’ चे दिग्दर्शन कृष्णकुमार रामकुमार करत आहेत. रोमियो पिक्चर्स, विष्णू विशाल आणि डी कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दरम्यान, मिथिलाने 2015 मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. निखिल आडवाणी यांचा ‘कट्टीबट्टी’ हा मिथिलाचा पहिला चित्रपट होता. ‘कारवाँ’ या चित्रपटात देखील ती दिसली होती. यातील तिच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते. 2017 मधील मुरांबा या मराठी चित्रपटात तिने काम केले.
इतकेच काय तर, मिथिला पालकरने ‘गर्ल इन द सिटी’ आणि नेटफ्लिक्सच्या ‘लिटिल थिंग्ज’या सीरिजमध्ये काम केले आहे. आता तामिळ चित्रपटात देखील मिथिला काम करण्यास सज्ज झाली आहे.