मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा फास आणखी घट्ट; मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी

Mithi River Scam | मुंबईतील मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. यातच आता आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयने मुंबईतील सुमारे 15 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे.
मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणात चित्रपट अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची चौकशी करण्यात आली आहे. दोघांनीही आर्थिक गैरव्यवहारात मुख्य आरोपी असलेल्या केतन कदम याच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क साधल्याचा संशय तपास संस्थांना आहे.
या प्रकरणात एकूण 13 जणांना आरोपी करण्यात आलेआहे. त्यापैकी आरोपी केतन कदम आणि जय जोशी हे अटकेत होते. जय जोशी याला कालच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे बीएमसीचे काही अधिकारी सुद्धा यात आरोपी आहेत. बीएमसीचे कंत्राटदार अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित देखील काही ठिकाणी छापेमारी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. ED Raid in Mumbai |
65 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप
या प्रकल्पासाठी 1100 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं. एकूण 18 कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आले होते. या प्रकरणात तब्बल 65 कोटी 54 लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आले आहेत. मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर गाळ पुशर आणि ड्रेजिंग मशीन खरेदी करण्यात आल्या होत्या. ही खरेदी कोचीस्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आली. मात्र, या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. Mithi River Scam |
केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आणि मुंबई महानगरपालिकेच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून निधीचा गैरवापर केल्याचा ठपका आहे. तपासात या आरोपींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेला गंडा घातल्याचे संकेतही मिळाले आहेत. Mithi River Scam |
या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात पाच कंत्राटदार, तीन दलाल, विविध कंपन्यांचे संचालक, महापालिकेचे विद्यमान आणि माजी अधिकारी यांचा समावेश आहे. Mithi River Scam |
हेही वाचा:
मंत्र्यांसाठी आयपॅडची खरेदी; ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च





