Mitchell Starc : निवृत्तीनंतर मिचेल स्टार्कने का मागितली कर्णधार मार्शची माफी? नेमकं कारण काय? जाणून घ्या

Mitchell Starc statement : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अलीकडेच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियासाठी 65 टी-20 सामन्यांत 79 विकेट्स घेणाऱ्या स्टार्कच्या या निर्णयाने क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले, पण सर्वाधिक धक्का बसला तो त्यांचा कर्णधार मिचेल मार्शला. स्टार्कने एका मुलाखतीत याचा खुलासा करताना आपल्या कर्णधाराची माफी मागितली आहे.
मिचेल मार्शची मागितली माफी –
ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये एकमेव टी-20 विश्वचषक जिंकला होता, ज्यामध्ये स्टार्क संघाचा महत्त्वाचा भाग होता. आता स्टार्क फक्त एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळणार आहे. मिचेल स्टार्कने क्रिकेट डॉट कॉम एयूला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने निवृत्तीचा निर्णय घेताना कर्णधार मिचेल मार्शला माहिती दिली नव्हती.
View this post on Instagram
स्टार्क म्हणाला, “मला कदाचित मिचेल मार्शला फोन करायला हवा होता. त्याने मला मेसेज केला आणि सांगितले की त्याला इन्स्टाग्रामवरून माझ्या निवृत्तीची बातमी कळली. मला याबद्दल वाईट वाटले की मी कर्णधाराला सांगितले नाही, मी त्याची माफी मागतो.” त्याने 2021 च्या टी-20 विश्वचषक विजयाचा गौरव केला, पण ऑस्ट्रेलियात या यशाला कमी महत्त्व दिले जाते, असेही नमूद केले. त्याची पत्नी एलिसा हीली, जी सहा वेळा महिला टी-20 विश्वचषक विजेती आहे, त्याला “फक्त एकच ट्रॉफी आहे, शांत राहा” असे म्हणते, असे स्टार्कने सांगितले.
हेही वाचा – Lionel Messi : लिओनेल मेस्सी का झाला भावूक? सामन्यादरम्यान डोळ्यांत दिसले अश्रू, VIDEO होतोय व्हायरल
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष –
स्टार्कने मुलाखतीत आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. तो 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळू इच्छितो. “मी तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकू इच्छितो,” असे त्याने ठामपणे सांगितले. स्टार्क 2015 (22 विकेट्स) आणि 2023 (16 विकेट्स) च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता. त्याने कसोटी क्रिकेटला नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि वयाच्या 35 व्या वर्षीही तो आपली प्राथमिकता कायम ठेवणार आहे.
हेही वाचा – Yograj Singh : ‘युवराजचा खरा मित्र फक्त सचिन! बाकी पाठीत खंजीर खुपसणारे…’, योगराज सिंगचा खळबळजनक दावा
विश्वचषकातील विक्रमाची नजर –
जर मिचेल स्टार्क 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवला, तर तो ग्लेन मॅकग्रा (71 विकेट्स) यांचा सर्वकालीन महान एकदिवसीय विश्वचषक गोलंदाजाचा विक्रम मोडू शकतो. सध्या स्टार्ककडे 65 विकेट्स असून, तो मुथैया मुरलीधरन (68 विकेट्स) यांच्यापासून फक्त 3 विकेट्स मागे आहे.





