New Zealand Cricket : टी-20 अन् वनडेसाठी किवी संघाला मिळाला नवा कर्णधार, ‘हा’ खेळाडू घेणार विल्यमसनची जागा..

Captain of New Zealand Cricket : डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरची बुधवारी केन विल्यमसनच्या जागी व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. जूनमध्ये टी-20 विश्वचषकानंतर विल्यमसनने कर्णधार पद सोडले होते.
आता न्यूझीलंडकडून 243 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला सँटनर वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार असेल. यापूर्वी त्याने 24 टी-20 आणि चार एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. डिसेंबरच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून तो पदभार स्वीकारेल.
News | Mitchell Santner has been appointed the new BLACKCAPS white ball captain, officially taking over the role from Kane Williamson, who stepped down following the ICC T20 World Cup in June. #CricketNation https://t.co/nnMQJt5Q1R
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 17, 2024
न्यूझीलंड क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात सँटनरनं म्हटले आहे की, ‘ही खूप सन्मानाची बाब आहे. न्यूझीलंडकडून खेळण्याचे माझे लहानपणापासून स्वप्न होते आणि दोन फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणे विशेष आहे.”
ICC Test Rankings 2024 : जो रूट पुन्हा अव्वलस्थानी, आपल्याच संघाच्या ‘या’ खेळाडूला टाकलं मागे…
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “मिशेल हा संघाचा सदस्य आहे आणि खेळाच्या प्रत्येक पैलूत तो आघाडीवर असतो. तो खूप शांत आहे आणि ड्रेसिंग रूममध्ये त्याचा खूप आदर आहे.”





