Indian student Missing : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता

ह्युस्टन – अमेरिकेत शिक्षण घेणारी २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी गेल्या ७ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. निथीशा कंदुला असे या विद्यार्थिनीचे नाव असून कॅलिफोर्निया विद्यापिठामध्ये ती शिक्षण घेत आहे. दिनांक २८ म पासून ती बेपत्ता आहे.
तिला सर्वात शेवटी लॉस एंजेलिसमध्ये बघितले गेले होते. दिनांक ३० मे रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली असल्याचे सॅन बाम्बार्डिनो पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. बेपत्ता होण्यापुर्वी निथीशा टोयोटा कोरोला कार चालवत असावी, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
गेल्या महिन्यात २ मे रोजी रुपेश चंद्र चिंताकिंद हा २६ वर्षांचा भारतीय विद्यार्थी देखील शिकागोमधून बेपत्ता झाला आहे. त्याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्यापूर्वी मार्च महिन्यापासून बेपत्ता असलेला मोहम्मदअब्दुल अरफात हा विद्यार्थी एप्रिल महिन्यात मृतावस्थेत आढळला होता.
तर अमरनाथ घोष या भारतीय नृत्य कलाकाराची मिसूरी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.अन्य काही भारतीयांवर प्राणगातक हल्ले झाले होते. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या गूढपणे बेपत्ता होण्याचे आणि त्यांची हत्या केली जाण्याचे सत्र अजूनही सुरू आहे.





