Misbah ul Haq : २००७ चा ‘व्हिलन’ आता पाकिस्तानचं नशीब बदलणार? निवड समितीमध्ये मिस्बाहची एन्ट्री होताच बड्या स्टार्सना डच्चू
Misbah ul Haq : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक याची निवड समितीमध्ये एन्ट्री झाली आहे.

Misbah ul Haq Pakistan Selection Committee : टी-२० विश्वचषक २०२६ मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे फेरबदल करण्यास सुरुवात झाली आहे. सुपर-८ फेरीतून बाहेर पडल्यानंतर निवड समितीचे सदस्य अलीम दार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक याची निवड समितीमध्ये एन्ट्री झाली आहे.
निवड समिती आणि संघातील मोठे बदल –
पाकिस्तानच्या नव्या निवड समितीमध्ये आता आकिब जावेद, असद शफीक, उस्मान हाश्मी आणि मिस्बाह उल हक यांचा समावेश आहे. निवड समितीने पदभार स्वीकारताच कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून, खराब फॉर्ममध्ये असलेल्या बाबर आझम आणि सॅम अयुब यांसारख्या मोठ्या खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे.
मिस्बाह उल हक: २००७ चा तो ‘खराब’ शॉट आणि अनुभव
🚨 BREAKING: New Selection Committee Announced 🚨
– Aaqib Javed
– Misbah-ul-Haq
– Sarfaraz Ahmed
– Asad ShafiqSatisfied??? pic.twitter.com/9AU1OeyQkn
— Talha Nawaz (@TalhaDigital007) March 5, 2026
मिस्बाह उल हक हे नाव भारतीय चाहत्यांच्याही चांगलेच लक्षात आहे. २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये मिस्बाहने मारलेल्या एका चुकीच्या शॉटमुळे पाकिस्तानने जेतेपद गमावले होते आणि भारताने विश्वचषक जिंकला होता. मात्र, खेळाडू म्हणून मिस्बाहची कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे:
- कसोटी: ७५ सामन्यांत १० शतकांसह ५२२२ धावा.
- वनडे: १६२ सामन्यांत ५१२२ धावा.
- टी-२०: ३९ सामन्यांत ७८८ धावा.
पाकिस्तानी क्रिकेटची स्थिती सुधारणार का?
गेल्या तीन आयसीसी स्पर्धांपासून पाकिस्तानची कामगिरी खालावलेली आहे. गेल्या विश्वचषकात ते ग्रुप स्टेजमधून बाहेर पडले होते, तर यंदा सुपर-८ च्या पुढे मजल मारता आली नाही. आता शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील संघ बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका खेळणार असून, मिस्बाहच्या अनुभवाचा फायदा संघाला होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





