‘तर लालू यादव यांच्या सरकारच्या काळात …’ ; आरजेडी खासदार मीसा भारती यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

Misa Bharti on Amit Shah । केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यात एनडीए कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. त्यासोबतच त्यांनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांनाही कोंडीत पकडले. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजद आणि काँग्रेसवर टीका केली. तसेच घराणेशाहीवरही निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेला आता आरजेडी नेते आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रत्युत्तर देत आहेत. त्यात राजदच्या खासदार मीसा भारती यांनी, “जेव्हा आरजेडी अध्यक्ष लालू यादव रेल्वेमंत्री होते तेव्हा त्यांनी बिहारला तीन कारखाने दिले होते. अमित शहांना हे माहित असायला हवे.” असे म्हणत त्यांनी शहा यांना उत्तर दिले आहे.
मीसा भारती पुढे म्हणाल्या, जर कोणी बिहारला कारखाना दिला असेल तर तो लालू यादव यांनीच दिला आहे. जर कोणी विचारले की बिहारमध्ये काय आहे, तर लालू यादव यांच्या सरकारच्या काळात बांधलेले ते तीन रेल्वे कारखाने आहेत. लालू यादव यांनी बिहारमध्ये सहा विद्यापीठे देण्याचे काम केले, त्यानंतर याठिकाणी सातवे विद्यापीठ बांधले गेले नाही.
राजद प्रवक्त्यानेही प्रत्युत्तर दिले Misa Bharti on Amit Shah ।
गृहमंत्री अमित शहा यांनी पाटण्याच्या बापू सभागृहात दिलेल्या भाषणावर राजदचे प्रवक्ते चित्रंजन गगन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाले की, एनडीए आणि भाजप नेत्यांचे काम केवळ पायाभरणी आणि योजना सुरू करण्याच्या नावाखाली मीडियातील बातम्या मिळवणे आहे, त्यांचा कामाशी काहीही संबंध नाही. अशा योजनांची यादी खूप मोठी आहे.” असे त्यांनी म्हटले.
‘एनडीएच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये २००% वाढ’
राजद प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, “केंद्रात दहा वर्षे आणि बिहारमध्ये जवळजवळ दोन दशके सत्तेत असलेले भाजप नेते विरोधी नेत्यांकडून जबाबदारीची मागणी करत आहेत यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. त्यांना ही माहिती फक्त सरकारी कागदपत्रांवरूनच मिळेल. आरजेडीच्या राजवटीच्या तुलनेत एनडीएच्या राजवटीत गुन्हेगारी घटनांमध्ये दोनशे टक्के वाढ झाली आहे.”
केंद्र सरकारने १० वर्षात बिहारला काय दिले? Misa Bharti on Amit Shah ।
ते म्हणाले की, भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्यावर लावलेली भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची यादीही पाहायला हवी होती. ते म्हणाले की, बिहारमधील लोकांना त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहे की केंद्र सरकारने १० वर्षांत बिहारला काय दिले?





