एका रात्रीत एवढ्या लोकांनी पाहिला ‘मिर्झापूर-2’ चा ट्रेलर, तुम्ही पाहिलाय का?

मुंबई- मिर्झापूरचं पहिलं सिझन प्रचंड लोकप्रिय झालं. मात्र आता त्याचं दुसरं सिझन तुमच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर काल रिलीझ करण्यात आला होता. एकाच दिवसात करोडो लोकांनी हा ट्रेलर पाहिला.
तब्बल 13,189,290 एवढ्या लोकांनी युट्यूबवर हा ट्रेलर पाहिला एवढंच नाही तर युट्यूबवर हा ट्रेलर पहिल्यया ट्रेंडिंगवर आहे. मिर्झापुरप्रमाणेच ‘मिर्झापूर 2’ देखील मसालेदार आणि रक्तरंजित खेळाने परिपूर्ण आहे. ‘मिर्झापूर 2’च्या ट्रेलरमध्ये अली फजल म्हणजेच, मिर्झापूरचा गुड्डू पंडीत एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. तर कालीन भैय्यासोबत मुन्ना त्रिपाठी मिर्झापूरवर राज्य करत आहे. ‘जो आया है, वो जाएगा भी। बस, मर्ज़ी हमारी होगी’ या कालीन भैय्या यांच्या आवाजात मिर्झापूर 2 च्या ट्रेलरची सुरुवात होते.
ट्रेलर पहा….
‘मिर्झापूर 2’ मध्ये विजय वर्मासह अनेक नवी पात्र दिसत आहेत. तसेच पहिल्या सीझनमध्ये कालीन भैय्या ज्या आयपीएस ऑफिसरला भिती घालत असतात, त्याचं गुपित या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आलं आहे.





