Mirzapur The Movie Box Office Day 1: कालीन भैया अन् गुड्डू पंडितची पुन्हा दहशत! ‘मिर्झापूर’ने पहिल्याच दिवशी कमावले कोट्यवधी
Mirzapur The Movie Box Office Day 1 चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. विशेषतः कालीन भैया आणि गुड्डू पंडित या लोकप्रिय पात्रांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली.

Mirzapur The Movie Box Office Day 1: ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजची आता मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 4 सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली.
चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. विशेषतः कालीन भैया आणि गुड्डू पंडित या लोकप्रिय पात्रांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईबाबत आधीपासूनच मोठ्या अपेक्षा होत्या.
पहिल्याच दिवशी 29 कोटींचा ग्रॉस कलेक्शन (Mirzapur The Movie Box Office Day 1)
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ने पहिल्या दिवशी भारतात सुमारे 24.75 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर चित्रपटाच्या ग्रॉस कलेक्शनचा आकडा जवळपास 29.70 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या दमदार सुरुवातीमुळे ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हा 2026 मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील सुरुवातीच्या चार चित्रपटांमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे सकाळच्या शोला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र जसजसा दिवस पुढे गेला, तसतशी प्रेक्षकांची गर्दी वाढत गेली. रात्रीच्या शोमध्ये चित्रपटाची ऑक्युपन्सी सुमारे 62 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे आकडे सांगतात.

Mirzapur the Movie
कालीन भैया आणि गुड्डू पंडित पुन्हा चर्चेत (Mirzapur The Movie Box Office Day 1)
‘मिर्झापूर’च्या यशामागे त्यातील दमदार पात्रांचा मोठा वाटा आहे. पंकज त्रिपाठी यांनी साकारलेला कालीन भैया आणि अली फजलचा गुड्डू पंडित ही पात्रे आधीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता हीच पात्रे मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांमध्ये उत्साह दिसून आला.
पंकज त्रिपाठी यांनी पुन्हा एकदा कालीन भैय्याची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. त्यांच्या शांत पण धाक निर्माण करणाऱ्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. अली फजलसोबतच दिव्येंदू शर्मा आणि रवि किशन यांच्याही अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ओटीटीपासून थिएटरपर्यंतचा प्रवास (Mirzapur The Movie Box Office Day 1)
एखादी लोकप्रिय वेबसीरिज थेट मोठ्या पडद्यावर आणणे ही निर्मात्यांसाठी मोठी जोखीम मानली जाते. कारण ओटीटीवर प्रेक्षकांनी स्वीकारलेली कथा आणि पात्रे थिएटरमध्येही तितकीच पसंतीस उतरतीलच, असे नाही. मात्र ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईवरून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
वीकेंडला कमाई वाढण्याची शक्यता
पहिल्या दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि चर्चेमुळे शनिवार-रविवारच्या सुट्टीत कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता ‘मिर्झापूर: द मूव्ही’ वीकेंडला बॉक्स ऑफिसवर किती मोठा आकडा गाठतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





