Rasika Duggal | अभिनेता रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला. मात्र या चित्रपटाबाबत अनेक संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. अतिशय क्रूर हिंसा दाखवणारे सीन्स दाखवण्यात आल्याचे म्हंटले. अलीकडेच अभिनेत्री रसिका दुग्गलने ‘ॲनिमल’ सिनेमाबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. ‘द वुमन एशइया इव्हेंट’मध्ये ‘मिर्झापूर’सीरिजमध्ये पंकज त्रिपाठींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री रसिका दुग्गलने ‘ॲनिमल’सिनेमावर म्हंटले की, “मला जे काम करायची इच्छा आहे ते काम देणाऱ्या संधी मला मिळत गेल्या तर मी नक्कीच करेन. आता ते नक्की किती प्रमाणात करायचं आहे हे मी ठरवेन. दुसरं म्हणजे मिसॉजिनी दाखवणारे आणि प्रॉपगंडा असणारे सिनेमे मी कधीच करणार नाही.” “माझ्या या मतावर मी ठाम आहे. यामुळेच मी ‘ॲनिमल’ सारखा सिनेमाही केला नसता. मला अशा भूमिका करायला आवडतील ज्या माझ्या खऱ्या आयुष्याशी निगडित नसतील. ज्यात कलाकार म्हणून अभिनयाचा कस लागेल अशा गोष्टी करायला मला नक्कीच आवडतील,” असेही ती म्हणाली. मात्र तिच्या या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. Rasika Duggal | सोशल मिडियावर कमेंट करत एका नेटकऱ्याने म्हंटले की, ‘हिनेच मिर्झापूर केलं ना?’,’खरंच रसिका हे बोलतेय? मिर्झापूरमध्ये तिचं कॅरेक्टर काय होतं सगळ्यांनी पाहिलं आणि तरी ती ॲनिमलवर बोलतेय?’, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. Rasika Duggal | हेही वाचा: गोवा सिलिंडर स्फोट प्रकरणात मोठी कारवाई ! क्लब मालकाला अटक ; आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू