ढाका : भारताचा युवा बॅडमिंटनपटू मिराबा लुवांगने शानदार कामगिरी करत बांग्लादेश ज्युनियर इंटरनॅशनल सिरिज स्पर्धेमध्ये मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह मिराबाने दोन महिन्यात दुसरे विजेतेपद पटकावले आहे. याआधी त्याने कोरिया ज्युनियर इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
Meiraba Luwang clinches second BWF junior title in two months by winning Bangladesh International Series.
— Press Trust of India (@PTI_News) December 22, 2019
अग्रमानांकित मणीपूरच्या मिराबाने स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मलेशियाच्या केन याँग ओंगचा २१-१४, २१-१८ असा पराभव केला. मिराबाने अवघ्या ३८ व्या मिनिंटात हा सामना जिंकत विजेतेपद पटकावले.
दरम्यान, मिराबाने उपांत्य फेरीत मलेशियाच्या एम फाजरिक मोहम्मद रिजवीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.