Pune News : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार प्रकरणात जामीन

पुणे : अल्प्वयीन मेव्हणीवर बलात्कार करणाऱ्याला विशेष न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. राकेश सोनार यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे डिसेंबर २०२४ गुन्हा दाखल झाला होता.
आरोपीने अल्पवयीन मेहुणीला लग्नाची आमिष दाखवून वारंवार जवळीक करून तिला मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला त्याला अटक केली असून, तो न्यायालयीन कोठडीत होता.
आरोपीची बाजू मांडताना ॲड. राकेश सोनार यांनी न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिले की, हा गुन्हा वैवाहिक कलाहातून दाखल झाला आहे. मेहुणी ही आरोपीच्या घरी शैक्षणिक कारणासाठी राहत होती. त्या अल्पवयीन मेहुणीचा संपूर्ण खर्च हा स्वतः आरोपी करत होता. सदरच्या गुन्हा दाखल होण्याची तारीख पाहता व सदरची घटना पाहता यातील असलेला तफावत यावरून आरोपीच्या विरोधात खोटा दाखल केला केल्याचे दिसून येत आहे.
बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचालक्यावर व फिर्यादी, साक्षीदार यांच्यावर कोणतेही दबाव न आणण्याच्या अटीवर हा निकला दिला. या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना हर्षवर्धन रेपे , शाक्य सुवी, ऋत्विक जाधव, ॲड. अविनाश खुडे ॲड . प्रियांका यादव यांनी सहकार्य केले.





