nagar | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून तिला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी तब्बल एक वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता.
सुनिल अंबादास तांबे (रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी हा नगर येथील आगरकर मळा येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, रवींद्र पांडे, सुरेश माळी व देवेंद्र शेलार यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले. सुनिल तांबे याने अल्पवयीन फिर्यादीस फुस लावुन, लग्नाचे आमिष दाखवुन ती अल्पवयीन असतांना तिचे सोबत शरीरी संबंध ठेवुन अत्याचार केला.
तसेच फिर्यादीतिचे लग्ना नंतर गरोदर असतांना तिचे सोबत शरीरी संबंध ठेवता यावे या करीता आरोपींने तिस गर्भपाताच्या गोळ्या देवून गर्भपात केला. फिर्यादीस वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देवून मारहाण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.





