Satara News : मंत्री नितीन गडकरी यांची भेट स्मरणीय – यशराज देसाई

कोयनानगर : लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी आज दि. २७ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. साखर उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान व शक्यतांबद्दल श्री. गडकरी यांनी यशराज देसाई यांना मार्गदर्शन केले.
श्री. गडकरी यांनी यशराज देसाई यांच्याशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद केला. याप्रसंगी त्यांनी लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याबाबत आस्थेने माहिती घेतली.
साखर उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान व शक्यतांबद्दलही त्यांनी देसाई यांना मार्गदर्शन केले. त्यांच्याशी झालेली चर्चा खूप काही शिकवून जाणारी व अत्यंत दिशादर्शक होती, आजची त्यांच्याबरोबरची भेट नेहमीच स्मरणात राहील, असे यशराज देसाई यांनी स्पष्ट केले.





